Our Blog

माझी जबाबदारी ऑनलाइन पोस्टर स्पर्धा२०२१

नमस्कार!!!

मी संयोजक या नात्याने, अशोकराव माने ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स, वाठार तर्फ वडगाव, जिल्हा कोल्हापूर आयोजित माझी जबाबदारी या ऑनलाइन पोस्टर स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे.

स्पर्धेबद्दल थोडक्यात :

आज आपणच आपल्या समोर अनेक समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत व त्या समस्यांचे समाधान दुसरे कोणी तरी शोधून काढेल यावर आपण पूर्णतः विसंबून बनत चाललो आहोत. अशा वेळी जर मला माझी जबाबदारी नाही समजली तर परिस्थिती कधी हाताबाहेर जाईल हे कळणारही नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावाने लोकांचे जीवनमान अडचणीत आले आहे ते लवकर सुरळीत होण्यासाठी मला माझी जबाबदारी लवकर ओळखावी लागेल. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. आपल्या भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी पर्यावरण सुरक्षिततेच्या संदर्भात मला माझी जबाबदारी ओळखावी लागेल. अस्वच्छतेमुळे तसेच घाणीमुळे रोगराई पसरत आहे त्यामुळे माझा परिसर व पर्यायाने माझा देश स्वच्छ व सुंदर होण्याच्या दृष्टीने मला माझी जबाबदारी लवकर ओळखावी लागेल. रस्ते अपघातात कित्येक लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतात. हे थांबवायचे असेल तर रस्ते सुरक्षा संदर्भात मला माझी जबाबदारी ओळखावी लागेल. स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करून लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे ते थांबवण्यासाठी अन्नभेसळ नियंत्रणासाठी मला माझी जबाबदारी ओळखावी लागेल. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा योग्य वापर कसा करता येईल आणि पाण्याची बचत कशी करता येईल यासाठी मला माझी जबाबदारी ओळखावी लागेल. माझ्या देशातील प्रत्येक स्त्रीला सुरक्षितता वाटावी तसेच त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी मला माझी जबाबदारी ओळखावी लागेल. आज देशाला भ्रष्टाचाराच्या किडीने पूर्णपणे पोखरून टाकले आहे. माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला ती नियंत्रित करण्यासाठी माझी जबाबदारी ओळखावी लागेल.

परंतु माझी जबाबदारी तेव्हाच पूर्ण होईल,

जेव्हा नष्ट होईल कोरोना बिमारी तेव्हा पूर्ण होईल माझी जबाबदारी

जेव्हा सबला होईल प्रत्येक नारी, तेव्हा पूर्ण होईल माझी जबाबदारी

जेव्हा स्वच्छ होईल दुनिया सारी, तेव्हा पूर्ण होईल माझी जबाबदारी

जेव्हा सुरक्षित होईल हरएक सवारी, तेव्हा पूर्ण होईल माझी जबाबदारी

जेव्हा संतुलित होईल वसुंधरा हमारी, तेव्हा पूर्ण होईल माझी जबाबदारी

जेव्हा प्रामाणिक होईल प्रवृत्ती भ्रष्टाचारी, तेव्हा पूर्ण होईल माझी जबाबदारी

जेव्हा बचत होईल थेंब थेंब वारि (जल), तेव्हा पूर्ण होईल माझी जबाबदारी

जेव्हा अन्न होईल उत्तम आहारी, तेव्हा पूर्ण होईल माझी जबाबदारी

या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाच्या उपक्रमात सहभागी होऊन जबाबदारीचे एक पाऊल पुढे टाकले त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभारी आहे.  आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम व्यवस्थितरीत्या पार पडला.

सहभागी सर्व स्पर्धकांचे पोस्टर्स आम्ही आपल्यासाठी खुले करत आहोत.

माझी जबाबदारी खुला गट १  

माझी जबाबदारी खुला गट 2

माझी जबाबदारी शालेय गट  

 

आम्ही स्पर्धेचा  निकाल जाहीर करत आहोत.

⇒ निकाल 

 

धन्यवाद !!

संयोजक

प्राध्यापक प्रवीण बसवेश्वर घेवारी

प्रभारी संचालक,

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,

वाठार तर्फ वडगाव

ता. हातकणंगले जि. कोल्हापूर