Our Blog

मजबूत करिअरसाठी हवा यांत्रिकी कणा

 मजबूत करिअरसाठी हवा यांत्रिकी कणा

(यांत्रिकी अभियांत्रिकीमधील संधीवर प्रकाशझोत टाकणारा लेख)

 Dr. H. V.  Shete

आजही अभियांत्रिकीची खरी ओळख आहे ती यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग). कारण रोजगाराच्या सर्वाधिक संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असणारी अभियांत्रिकी मधील एकमेव शाखा म्हणजे यांत्रिकी. थोडक्यात यांत्रिकी विना अपुरी आहे अभियांत्रिकी. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की का आहे मेकॅनिकल सर्वात जास्त कल असणारी इंजिनिअरिंगची शाखा व आपल्या मजबूत करियरसाठी का हवा आहे हा यांत्रिकी कणा. या लेखात यांत्रिकी अभियांत्रिकी मधील विविध संधीवर प्रकाशझोत टाकला आहे. हा लेख नक्कीच सर्व विद्यार्थी व पालकांना उपयुक्त आहे.

 

१. यांत्रिकी अभियांत्रिकीला सर्वात अधिक पसंती का दिली जाते?

देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक हातभार लावणारे क्षेत्र म्हणून औद्योगिक क्षेत्रास ओळखले जाते. थेट व सर्वाधिक रोजगार उपलब्ध करणारे क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते. शिवाय यंत्र हे मानवाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक म्हणून ओळखले जाते. आज माणसाचे आयुष्य सहज, गतीमान व प्रगतशील बनवण्यात यंत्रांचा खुप मोठा वाटा आहे व त्याच कारणांमुळे माणसाला या क्षेत्राची तीव्र ओढ आहे. किंबहुना हेच कारण आहे की माणसाचे स्वप्न पूर्ण करणारे क्षेत्र म्हणून यांत्रिकी अभियांत्रिकीला सर्वात अधिक पसंती दिली जाते.

२. यांत्रिकी अभियंता होण्याचे स्वप्न कसे पूर्ण होऊ शकते?

१. डिप्लोमा मेकॅनिकल (Diploma Mechanical) -  जर तुम्हाला दहावीनंतर यांत्रिकीचे तंत्रशिक्षण घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही यांत्रिकी अभियांत्रिकी या पदविका अभ्यासक्रमाला प्राधान्य देऊ शकता. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असतो. या अभ्यासक्रमाला व्यावसायिक दर्जा असल्याने तुमचे नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकते. अशोकराव माने पॉलिटेक्निक, वाठार येथे पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी www.amietv.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

२. डिग्री मेकॅनिकल (BE/BTECH Mechanical) -  जर तुम्हाला बारावी झाल्यानंतर यांत्रिकीचे तंत्रशिक्षण घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही यांत्रिकी अभियांत्रिकी या पदवी अभ्यासक्रमाला प्राधान्य देऊ शकता. हा चार वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून तुम्ही विज्ञान शाखेतील बारावी नंतर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. परंतु राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची सामायिक पात्रता प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते. अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार येथे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रवेशासाठी तसेच प्रवेश प्रक्रिया माहिती संदर्भात www.amgoi.org या संकेतस्थळावर भेट द्यावी.

३. पोस्ट डिग्री मेकॅनिकल (ME/MTECH Mechanical) - ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर तांत्रिकीमधील आवडीच्या क्षेत्रात विशेषज्ञता मिळवायची आहे त्यासाठी  हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त व योग्य आहे. यासाठी पदवीच्या शेवटच्या वर्षी गेट (GATE) ही सामायिक पात्रता प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते. अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार येथे यांत्रिकीमधील दोन उत्कृष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर  प्रोडक्शन व डिझाईन या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी प्रवेशासाठी तसेच प्रवेश प्रक्रिया माहिती संदर्भात www.amgoi.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

 

३.  यांत्रिकी अभियंत्याची  कामे भूरळ का पाडतात?

१. रिसर्च इंजिनिअर

माणसाच्या दैनंदिन वापरातील छोट्यामोठ्या वस्तूंपासून ते औद्योगिक वापरातील मोठ्या यंत्रापर्यंत दररोज जगभरात संशोधन चालू असते जेणेकरून त्या वापरताना कामात सहजता यावी, काम पटकन व्हावे व मनुष्याचे श्रम अगदी नगण्य व्हावेत. संशोधन हा उद्योगांचा प्रमुख कणा असल्यामुळे कंपन्या यासाठी प्रचंड खर्च करतात व त्यामुळेच रिसर्च इंजिनिअरची मागणी इतकी आहे की त्यासाठी ते कोट्यवधी रूपयांचे पगार देऊ करतात. किंबहुना याच कारणामुळे हे काम भूरळ पाडते

२. डिझाईन व डेवलपमेंट इंजिनिअर

एकाच उत्पादनवर काम करणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आहेत. त्यामुळे प्रत्येक कंपनी आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर खुप मेहनत घेत असते. आपल्या उत्पादनाचे वेगळेपण जपण्यासाठी सर्वच कंपन्या डिझाईन व डेवलपमेंट वर भर देताना दिसून येतात. त्यासाठी ते सतत यामध्ये काम करणारे अभियंते शोधत असतात व आकर्षक पगारही देऊ करतात व हेच कारण असावे की हे काम भूरळ पाडते.

३. प्रोडक्शन इंजिनिअर

औद्योगिक क्षेत्रात वस्तू बाजारपेठेत जलद उपलब्ध करून देणे व ग्राहकापर्यंत लवकर पोहचवणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे विना चूक व अडथळा वस्तूंचे उत्पादन निर्माण करणे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच प्रोडक्शन लाईन वर काम करणारा अभियंता हा खूप मागणी असणारा असतो व त्याला चांगला पगार देऊ केला जातो. त्यामुळे हेही काम भूरळ पाडते.

४. मेंटेनन्स इंजिनिअर

उत्पादन निर्मिती दरम्यान कोणतीही समस्या येऊ नये यासाठी देखभाल हा अतिशय संवेदनशील भाग समजला जातो. शिवाय वस्तू ग्राहकांना दिल्यानंतर तिच्या संदर्भात सेवा पुरवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. अशा वेळी गरजेचे असते ते देखभाल करणारे लोक म्हणून या कामाला ही तितकेच महत्त्वाचे  मानले गेले आहे. यासाठी कंपन्या चांगला मोबदला द्यावयास तयार असतात व म्हणूनच हेही काम भूरळ पाडते.

५. मार्केटिंग व सेल्स इंजिनिअर

कोणत्याही कंपनीची वाढ तिच्या उत्पादनच्या विक्रीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक कंपनीला तिचा विक्रीचा आलेख हा चढता पहावयास आवडतो. परंतु त्यासाठी आवश्यक असतात तरूण, उत्साही व हुशार लोक जे उत्पादनाची विशेषता, गुणवत्ता व किंमत ग्राहकांना सहज पटवून देऊ शकतात. व कंपनी अशा लोकांना कितीही मोबदला देण्यास इच्छूक असतात म्हणूनच हेही काम भूरळ पाडते.

६. सॉफ्टवेअर इंजिनिअर

औद्योगिक क्षेत्रात ऑटोमेशन ला प्रंचड महत्त्व आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या समस्या ओळखून त्यावर तात्काळ उपाय शोधणे गरजेचे असते. याच क्षेत्रातील व्यक्ती जीला कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स संदर्भात ज्ञान आहे तीला ऑटोमेशन साठी प्रचंड मागणी आहे. म्हणून हे काम खूप भूरळ घालते.

 

४. यांत्रिकी अभियंत्यास कोणत्या संधी उपलब्ध आहेत ?

१. सरकारी क्षेत्रात (GOVERNMENT) नोकरीच्या संधी

संरक्षण:

आर्मी, नेव्ही,  एअरफोर्स या सारख्या संरक्षण दलाच्या नोकरी काम मध्ये करण्याची संधी उपलब्ध होते.

प्रशासकीय:

एनर्जी, आरटीओ, पॉवर प्लांट, रेल्वे (RRB), पाटबंधारे (PWD), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद यासारख्या प्रशासकीय नोकरी मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते.

संशोधन:

इस्रो (ISRO), डीआरडीओ (DRDO), बीएआरसी (BARC) यासारख्या संशोधन नोकरी मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते.

भरती जाहिरात,आवश्यक पात्रता, नियम व अटींसाठी संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर माहिती पहावी.

२. सार्वजनिक क्षेत्रात  (PSU) नोकरीच्या संधी

सार्वजनिक क्षेत्रातील आकर्षक पगार असणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक, भेल, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, गेल, सेल, ओएनजीसी, आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स इ. विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. भरती जाहिरात,आवश्यक पात्रता, नियम व अटींसाठी संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती पहावी.

३. खाजगी क्षेत्रात (PRIVATE) नोकरीच्या संधी

अॅटोमोबाईल व ट्रान्सपोर्टेशन:

मारूती सुझुकी, हिंद मोटर्स, फोर्स, टाटा मोटर्स,महिंद्रा, बजाज, हिरो, आयशर मोटर्स, इसुजी, फोर्ड, टोयोटा, ह्युंदाई, टीव्हीएस मोटर्स, अशोक लेलँड, मर्सिडीज, स्कोडा, हेक्टर, बीएमडब्ल्यू, रेनॉल्ट यासारख्या अनेक वाहन निर्मिती संबंधित कंपन्यांमध्ये पुष्कळ नोकरी उपलब्ध आहेत

मटेरियल व प्रोडक्शन:

टाटा स्टील, जिंदाल स्टील, इस्सार स्टील, एपीएल अपोलो, मिश्र धातू निगम, स्टील एक्सचेंज, जय बालाजी, हिसार स्टील, टाटा मेटॅलिक यासारख्या मटेरियल प्रक्रिया व निर्मिती कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध आहे.

मशिनरी व अॅन्सेलरी:

किर्लोस्कर, बीईएमएल, भारत इलेक्ट्रिकल, नेस्को, पेन्नार, थरमॅक्स, बॉश, भारत फोर्ज, कल्यानी यासारख्या मशिनरी व उत्पादन संबंधित कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध आहे.

डोमेस्टिक अप्लायन्सेस:

एलजी, व्हर्लपूल, सिंफनी, ब्लू स्टार, अंबर, गोदरेज, बजाज, फिलिप, व्होल्टास यासारख्या डोमेस्टिक अप्लायन्सेस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध आहे.

४. व्यवसाय व अन्य संधी

यांत्रिकी अभियंता स्वत:चे वर्कशॉप वजा इंडस्ट्री उभी करून यंत्र व उपकरणे निर्मिती, देखभाल, सेवा, सल्ला इ. संदर्भात स्वतः चा व्यवसाय सुरू करू शकतात. शिवाय पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचे काम करू शकतात.

 

५. भविष्यात यांत्रिकी अभियांत्रिकीसाठी संधींचे विस्तृत दालन का खुले आहे?

जग industry 4.0 (चौथी औद्योगिक क्रांती) च्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे, जिथे अॉटोमेशन ला प्रचंड महत्त्व आले आहे. त्यामुळे स्मार्ट फॅक्टरी ही संकल्पना उदयास येत आहे  अद्यापही यामधील संशोधन प्राथमिक स्तरावर असून येत्या काळात ते अधिक करणे आवश्यक बनणार आहे व त्यामधून रोजगार व संधींचे विस्तृत दालन खुले होत आहे. शिवाय लघु, मध्यम व मोठ्या व्यवसायाचे जाळे संपूर्ण भारतात एमआयडीसी च्या स्वरूपात विस्तृतपणे पसरलेले एकमेव क्षेत्र म्हणून यांत्रिकी ला ओळखले जाते. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग उद्योगातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे ज्यामुळे यांत्रिकी शाखेचे अनन्यसाधारण महत्त्व वाढणार आहे.

अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया असलेली यांत्रिकी अभियांत्रिकी रोजगार निर्मितीसाठी सदैव सक्षम शाखा आहे त्यामुळेच तुमच्या करिअर च्या मजबुतीसाठी हवा आहे यांत्रिकी कणा.

यांत्रिकी विभागाबद्दल थोडक्यात माहिती

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटशन्स वाठार येथील यांत्रिकी विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे. सर्वात जास्त विद्यार्थी संख्या, शिस्त, प्लेसमेंट, उत्कृष्ट अकॅडेमीक, विद्यार्थी प्रिय अध्यापक वर्ग व इंडस्ट्री सुसज्ज लॅब यामुळे या विभागाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यांत्रिकी विभाग एनबीए मानांकन प्राप्त असून गुणवत्तापूर्ण अभियंते घडविण्यासाठी ओळखले जाते.

यांत्रिकी विभागाचे काही निवडक माजी विद्यार्थी

 

महाविद्यालया बद्दल थोडक्यात माहिती

ग्रामीण भागातील व तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत उच्च व गुणवत्तापूर्ण अत्याधुनिक शिक्षण पोहोचले पाहिजे या उद्दात हेतूने सन २००९ साली श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप या संस्थेअंतर्गत अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.  वाठार तर्फ वडगाव येथे २० एकरच्या निसर्गरम्य परिसरात इंटिग्रेटेड कॅम्पस आहे. यामध्ये अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, एम. बी. ए. व आय. टी. आय. हे अभ्यासक्रम चालवले जातात. या कॅम्पस मध्ये दरवर्षी ३००० हून अधिक विद्यार्थ्यी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत.

महाविद्यालयाला नॅकचे 'ए' ग्रेड मानांकन प्राप्त असून मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल हे अभ्यासक्रम एनबीए मानांकित आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री विजयसिंह माने यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची घौडदौड यशस्वीरीत्या चालू आहे.

धन्यवाद !!!

प्रा. डॉ. एच. व्ही. शेटे

विभागप्रमुख, यांत्रिकी अभियांत्रिकी, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार

(संकलन : प्रा. एस. बी. पाटील)

 लेखक

 प्राध्यापक डॉ. हणमंत वीरभद्र शेटे

 विभागप्रमुख, यांत्रिकी

 अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,

 वाठार तर्फ वडगाव

 ता. हातकणंगले जि. कोल्हापूर

 महाराष्ट्र पिन ४१६११२

 मोबाईल : +९१ ९८२३९२५४४०

 email : hvs@amgoi.edu.in
 

लेखकाबद्दल थोडक्यात माहिती

लेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्राध्यापक असून विभागप्रमु़ख या पदी काम करत आहेत. त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात २१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच त्यांनी मेकॅनिकल मधून पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांना ऍडमिशन, करिअर कॉऊंसेल्लिंग व प्रशासनाचा  चांगला अनुभव आहे. लेखकांचे कंट्रोल इंजिनिअरिंग या विषयाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. लेखकांचे आतापर्यंत १० हून अधिक शोधनिबंध विविध देशात प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये युनायटेड किंग्डम, स्वित्झर्लंड, मलेशिया, अमेरिका इ. देशातील नामांकित जर्नल्स चा समावेश आहे. लेखकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी चे मेकॅनिकल शाखेचे पीएचडी साठी अधिकृत गाईड म्हणून मान्यता मिळाली आहे.