Our Blog

पॉवरफुल करिअरसाठी निवडा विद्युत अभियांत्रिकी

 पॉवरफुल करिअरसाठी निवडा विद्युत अभियांत्रिकी

(विद्युत अभियांत्रिकी मधील विविध संधीवर प्रकाशझोत टाकणारा लेख)

By 1. Prof. P. B. Ghewari, 2. Prof. S. H. Shete, 3. Prof. N. J. Kumbhar

 

जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअर व्हायचे ठरवले आहे परंतु अद्यापही विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) संबंधित काही गोष्टींबाबत अनभिज्ञ आहात तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी खास लिहिला आहे. या शाखेचे वेगळेपण, प्रवेशासाठी लागणारी पात्रता, कामाचे स्वरूप, संधी, भविष्य या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थी व पालकांनी हा लेख आवर्जून वाचावा.

 

. विद्युत अभियांत्रिकीचे वेगळेपण काय आहे?

पारंपरिक दृष्टीने ही शाखा वीज निर्मिती, वहन पुरवठा या संदर्भात ओळखली जाते परंतु ही खुप निराळी शाखा आहे. या शाखेत कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकल या चार वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश होतो किंबहुना याच कारणामुळे या शाखेने आपले वेगळेपण जपले आहे

 

. विद्युत अभियांत्रिकी प्रवेशासाठी काय पात्रता असते?

. डिप्लोमा इलेक्ट्रिकल (Diploma) - हा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम असून दहावीनंतर तुम्ही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता.

. डिग्री इलेक्ट्रिकल (BE/BTECH) - हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून तुम्ही विज्ञान शाखेतील बारावी नंतर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. परंतु राज्य शासनाची  अथवा केंद्र शासनाची सामायिक पात्रता प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते.

. पोस्ट डिग्री इलेक्ट्रिकल (ME/MTECH) - हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असून तुम्ही विद्युत अभियांत्रिकी पदवी नंतर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. परंतु गेट (GATE) ही सामायिक पात्रता प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते.

 

. विद्युत अभियांत्रिकी साठी कोठे प्रवेश घेऊ शकता?

भारतातील विविध आयआयटी, एनआयटी, शासकीय तसेच एआयसीटीई संलग्नित खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये जेथे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे अशा ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार येथे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रवेशासाठी तसेच प्रवेश प्रक्रिया माहिती संदर्भात www.amgoi.org या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. अशोकराव माने पॉलिटेक्निक, वाठार येथे पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी www.amietv.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

 

. विद्युत अभियंत्याची (Electrical Engineer) कामे काय असतात?

. इलेक्ट्रिकल सिस्टीमचे अवलोकन नियंत्रण करणे

. इलेक्ट्रिकल वस्तूंची निर्मिती करणे

. इलेक्ट्रिकल वस्तूंची क्षमता ठरविणे

. घरगुती औद्योगिक वापरासाठी आवश्यक उपकरणे यंत्रे विकसित करणे

. वीज बचत करणारी यंत्रे उपकरणे निर्माण करणे

. वीज निर्मिती दरम्यान नियंत्रण करणारी यंत्रे तयार करणे

. वीज यंत्रांची निर्मिती, वापर, सुरक्षा, देखभाल, कागदपत्रे . संदर्भात निर्देशने तयार करणे

. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा तत्सम सेवा पुरवणे

. विद्युत अभियंताच्या  (Electrical Engineer) कामाचे स्वरूप काय असू शकते?

. मुख्य अभियंता

. कनिष्ठ अभियंता

. विद्युत तंत्रज्ञ

. प्रोजेक्ट मॅनेजर

. विद्युत सल्लागार

. ऑपरेशन मॅनेजर

. प्रोजेक्ट हेड

. संशोधन प्रमुख .

 

. विद्युत अभियंत्यास (Electrical Engineer) कोण कोणत्या संधी उपलब्ध आहेत ?

 

. सरकारी क्षेत्रात (GOVERNMENT) नोकरीच्या संधी

राज्य इलेक्ट्रिसिटी बोर्ड उदा. एमएसईबी (MSEB), पॉवर प्लांट, रेल्वे (RRB), पाटबंधारे (PWD), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), संरक्षण, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, इस्रो (ISRO), डीआरडीओ (DRDO), बीएआरसी (BARC) . विविध ठिकाणी अभियंता, अधिकारी किंवा संशोधक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होते. भरती जाहिरात,आवश्यक पात्रता, नियम अटींसाठी संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर माहिती पहावी.

 

. सार्वजनिक क्षेत्रात  (PSU) नोकरीच्या संधी

सार्वजनिक क्षेत्रातील आकर्षक पगार असणाऱ्या BHEL, NTPC, PGCIL, GAIL, SAIL, ONGC, IOCL, BPCL, HPCL, COAL INDIA, HAL . विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. भरती जाहिरात,आवश्यक पात्रता, नियम अटींसाठी संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती पहावी.

 

. खाजगी क्षेत्रात (PRIVATE) नोकरीच्या संधी

सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे खाजगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्या जसे की RELIANCE, JINDAL STEEL AND POWER LTD, TATA STEEL AND POWER LTD, L&T CONSTRUCTION AND STEEL, BHUSHAN STEEL, HINDUSTAN MOTORS, TATA MOTORS, TATA METTALIC, DURGAPUR STEEL PLANT, BAJAJ, INFOSYS, TCS, SIEMENS . ५००० हून अधिक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे.

 

. व्यवसाय अन्य संधी

विद्युत अभियंता विद्युत यंत्र उपकरणे निर्मिती, देखभाल, सेवा, सल्ला . संदर्भात स्वतः चा व्यवसाय सुरू करू शकतात. शिवाय पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचे काम करू शकतात.

 

. विद्युत अभियांत्रिकीचे (Electrical Engineering) भविष्य कसे आहे ?

अन्न, वस्त्र, निवारा, पाणी यासोबत वीज अत्यावश्यक बनली आहे. घरगुती वापरातील वस्तू जसे की टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर, फॅन, मोबाईल, एसी यांचा वापर अनिवार्य होत चालला आहे. तसेच औद्योगिक वापरातील यंत्रे, कम्युनिकेशन टॉवर्स वीजेशिवाय निकामी आहेतवीजेची गरज पाहता नजीकच्या काळात हा वापर अजून वाढणार आहे. वाढत्या गरजेनुसार निव्वळ वीज निर्मितीवर भर देऊन पुरेसे नसून वीज बचत करण्यासाठी पर्यावरण पूरक यंत्राची निर्मिती तसेच तंत्रज्ञानात आवश्यक संशोधन करणे गरजेचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात भरपूर संधी निर्माण होताना दिसत आहेत.

नैसर्गिक इंधनाच्या साठ्यांचा विचार करता तसेच दळणवळणासाठी वाहनाचा वाढता वापर पाहता भविष्यात ही संसाधने संपुष्टात येण्याची भीती आहे. शिवाय डिझेल पेट्रोल वापर करणारी वाहने दूषित वातावरणासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच पर्याय म्हणून इलेक्ट्रीसिटी वर आधारित वाहनांच्या वापराची मागणी जोर धरू लागली आहे याकडे भविष्यातील दळणवळणासाठी पर्याय म्हणून पाहिले जात आहे. म्हणून जगातील अॅटोमोबाईल मधील दिग्गज कंपन्या जसे की टेसला  (TESLA), बीएमडब्ल्यू (BMW) . यांनी पुढाकार घेऊन अशा वाहनांची निर्मिती चालू केली आहे. या वाहनांसोबत आवश्यक सोयी सुविधा पुरविणे ही गरजेचे होणार आहे. त्यामुळे नजिकच्या काळात यामधून मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सद्या दळणवळणाच्या गतीशील माध्यमांची प्रवासाच्या जलद सोयीची गरज वाढत चालली आहे. त्यामुळेच मेट्रो सारख्या प्रवासाच्या माध्यमाची आवश्यकता झाली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी विद्युत अभियांत्रिकीची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सध्या गतीशील जगासाठी आवश्यक असणारी यंत्र निर्मिती, दळणवळणाची साधने , उपकरणे, कम्युनिकेशन्सची साधने सर्व गोष्टी या वीज या एकमेव गोष्टी पाशी येऊन थांबतात त्यांचे अस्तित्व भविष्य हे पुर्णपणे विद्युत अभियांत्रिकी या महत्त्वाच्या शाखेशी जोडले आहे.

म्हणूनच जगाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विद्युत अभियांत्रिकीला  महत्वपुर्ण भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही विद्युत अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी घेतलेला निर्णय नक्कीच तुमचे करियर पॉवरफुल करण्यासाठी सज्ज आहे.

 

महाविद्यालया बद्दल थोडक्यात माहिती

ग्रामीण भागातील तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत उच्च गुणवत्तापूर्ण अत्याधुनिक शिक्षण पोहोचले पाहिजे या उद्दात हेतूने सन २००९ साली श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप या संस्थेअंतर्गत अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलीवाठार तर्फ वडगाव येथे २० एकरच्या निसर्गरम्य परिसरात इंटिग्रेटेड कॅम्पस आहे. यामध्ये अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, एम. बी. . आय. टी. आय. हे अभ्यासक्रम चालवले जातात. या कॅम्पस मध्ये दरवर्षी ३००० हून अधिक विद्यार्थ्यी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत.

महाविद्यालयाला नॅकचे '' ग्रेड मानांकन प्राप्त असून मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल हे अभ्यासक्रम एनबीए मानांकित आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री विजयसिंह माने यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची घौडदौड यशस्वीरीत्या चालू आहे.

धन्यवाद !!!

 

. प्रा. पी. बी. घेवारी

प्रभारी संचालक, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार

. प्रा. एस. एच. शेटे

विभागप्रमुख, विद्युत अभियांत्रिकी, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार

. प्रा. एन. जे. कुंभार

प्राध्यापक,विद्युत अभियांत्रिकी, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार

 

लेखक

प्राध्यापक प्रवीण बसवेश्वर घेवारी

प्रभारी संचालक,

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,

वाठार तर्फ वडगाव

ता. हातकणंगले जि. कोल्हापूर

महाराष्ट्र पिन ४१६११२

मोबाईल : ७९७२८८२८०८

email : director@amgoi.edu.in

लेखकाबद्दल थोडक्यात माहिती

लेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये प्रभारी संचालक या पदी काम करत आहेत. त्याचप्रमाणे ते  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात २५ वर्ष प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना ऍडमिशन  तसेच करिअर कॉऊंसेल्लिंग चा चांगला अनुभव आहे.

 

लेखिका 

 प्राध्यापक सौ. संगीता हणमंत शेटे

 विभागप्रमुख, विद्युत अभियांत्रिकी

 अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,

 वाठार तर्फ वडगाव 

 ता. हातकणंगले जि. कोल्हापूर 

 महाराष्ट्र पिन ४१६११२ 

 मोबाईल : ९१५८४२३०४४

 email : shs@amgoi.edu.in

लेखिकेबद्दल थोडक्यात माहिती

 लेखिका सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये विद्युत अभियांत्रिकी या शाखेमध्ये प्राध्यापक असून विभागप्रमुख या पदी काम करत आहेत. त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात १८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सध्या त्यांचे पीएचडी चे काम चालू असून त्यांचे  Electrical Machines, Electrical   Drives, Switchgear Protection या विषयांचा शिकवण्याचा उत्कृष्ट हातखंडा आहे. 

 

 लेखक 

 प्राध्यापक निलेशकुमार जयवंत कुंभार

 विद्युत अभियांत्रिकी विभाग

 अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,

 वाठार तर्फ वडगाव 

 ता. हातकणंगले जि. कोल्हापूर 

 महाराष्ट्र पिन ४१६११२ 

 मोबाईल : ९९७०४३७७४१

 email : njk@amgoi.edu.in

लेखकाबद्दल थोडक्यात माहिती

 लेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये विद्युत अभियांत्रिकी या विभागात प्राध्यापक असून त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव आहे. विद्युत   अभियांत्रिकी मधील विविध विषयांवर त्यांची चांगली पकड आहे.