Our Blog

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी २०२० मध्ये होणाऱ्या विविध पात्रता प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक

१२ वी नंतर करिअर निवडताना अभियांत्रिकी  हे विद्यार्थ्याचे व पालकांचे सर्वाधिक पसंती असणाऱ्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १२ बोर्ड परीक्षा होताच सर्व विद्यार्थी व पालकांचे वेध लागते ते पात्रता प्रवेश परीक्षा. दरवर्षी १० लाखाहून अधिक विद्यार्थी  वेगवेगळ्या प्रवेश पात्रता परीक्षांची निवड करत असतात. आता एप्रिल महिन्यापासून राज्यस्तरावर तसेच केन्द्रीयस्तरावर विविध पात्रता परीक्षा चालू होत आहेत. त्यापैकी काही महत्वपूर्ण पात्रता प्रवेश परीक्षा ज्यामध्ये संपूर्ण भारतातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते . परंतु बरेच विद्यार्थी व पालक  राज्यस्तरावरील पात्रता प्रवेश वगळता इतर परीक्षांबद्दल अनभिक्त असतात. तरी राज्यस्तराबरोबर इतर राज्यातल्या व केन्द्रीयस्तरावरील वेगवेगळ्या परीक्षांची माहिती होण्याच्या उद्देशाने सदर लेख लिहीत आहोत. खाली दिलेल्या कोष्टकात परीक्षा, तारीख, अधिक माहितीसाठी संकेतस्थळ तसेच परीक्षा कोण घेतात याची थोडक्यात माहिती दिली आहे.

 

अ क्र परीक्षेचे नाव तारीख संकेत स्थळ परीक्षा कोण घेतात
Joint Entrance Examination (JEE) Main ( जे.ई.ई.मेन ) 5, 7, 9, 11 April 2020 (५ ते ११ एप्रिल दरम्यान) https://jeemain.nta.nic.in/ Central Government : National Testing Agency (केंद्र सरकार: नॅशनल टेस्टिंग एजन्सी )
MHT CET
(एम.एच.टी. सीईटी )
13-23 April 2020 (१२ ते २३ एप्रिल दरम्यान) https://mhtcet2020.mahaonline.gov.in/ State Government :
Maharashtra (राज्य सरकार : महाराष्ट्र)
VITEEE (वीटी ) 13-19 April 2020 (१३ ते १९ एप्रिल दरम्यान) https://viteee.vit.ac.in/ Private University: Vellore (खाजगी विद्यापीठ : वेल्लोर)
Manipal (B. Tech) (मणिपाल) 17 -27 April 2020 (१७ ते  २७ एप्रिल दरम्यान) https://manipal.edu/ Private University: Manipal खाजगी विद्यापीठ : मणिपाल
NDA I Entrance with PCM (MPC) ( एन.डी.ए. ) 19 April 2020 (१९ एप्रिल रोजी ) https://www.upsc.gov.in/ Central Government (केंद्र सरकार)
IPU-CET (B. Tech) (आय.पी.यू. सीईटी) 25 April - 5 May 2020
(२५ एप्रिल ते ५ मे दरम्यान)
http://www.ipu.ac.in/ State Government : Delhi (राज्य सरकार : दिल्ली)
COMED-K (कोमेड- के ) 10 May 2020
(१० मे रोजी)
https://www.comedk.org/ State Government : Karnataka (राज्य सरकार : कर्नाटक)
JEE Advanced ( जे.ई.ई.अडवान्सड  ) 17 May 2020
(१७ मे रोजी )
https://jeeadv.ac.in/ Central Government : National Testing Agency केंद्र सरकार : नॅशनल टेस्टिंग एजन्सी
Birla Institute of Technology and Science Admission Test (BITSAT) (बिटसेट ) 16 May to 25 May (१६ ते २५ मे दरम्यान) https://www.bitsadmission.com/ Autonomous: Birla Institute (स्वायत्त : बिर्ला इन्स्टिटयूट)
१० AMU (B. Tech) (एएमयू ) 31 May 2020
(३१ मे रोजी)
https://www.amucontrollerexams.com/ Central University (केंद्रीय विद्यापीठ)

वरील परीक्षांबद्दल  सविस्तर माहिती पाहूया 

1.    Joint Entrance Examination (JEE) Main ( जे.ई.ई.मेन ) 

आयआयटी, एनआयटी तसेच देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये बीई किंवा बीटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हि सामायिक पात्रता प्रवेश परीक्षा देशभरात घेतली जाते. केंद्रीय स्तरावर घेतली जाणारी हि परीक्षा देशातील कोणत्याही खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी ग्राह्य मानली जाते. तसेच जेईई अडवान्सड परीक्षेची हि पात्रता परीक्षा आहे. 

2.    MHT CET (एम.एच.टी. सीईटी )

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरावर हि सामायिक पात्रता प्रवेश परीक्षा घेतली जाते.  महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी हि परीक्षा देणे आवश्यक आहे. 

3.    VITEEE (वीटी )

वेल्लोर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या खासगी विद्यापीठामार्फत देशभरात केंदीय स्तरावर हि परीक्षा घेतली जाते. हे विद्यापीठ तामिळनाडू, आंध्रप्रदेश, भोपाळ व राजस्थान या चार राज्यामध्ये आहे. 


4.    Manipal (B. Tech) (मणिपाल)

मूळचे सिक्कीम राज्यातील हे विद्यापीठ सिक्कीम, कर्नाटक व राजस्थान ह्या राज्यात असून हे खासगी विद्यापीठ आहे. हि परीक्षा देशभरात घेतली जाते. 

5.    NDA I ( एन.डी.ए. ) 

भारतीय संरक्षण दलात जाऊ इच्छुक विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी मार्फत हि परीक्षा दरवर्षी घेतली जाते. ह्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी संरक्षण दलात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करू शकतात. तसेच संरक्षण दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

6.    IPU-CET (B. Tech) (आय.पी.यू. सीईटी)

दिल्ली राज्यसरकारमार्फत हि परीक्षा दरवर्षी राज्यस्तरावर घेतली जाते. इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी हि दिल्ली राज्याचे विद्यापीठ आहे. दिल्लीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि परीक्षा महत्वाची आहे.  

7.    COMED-K (कोमेड- के )

कर्नाटक राज्य सरकार राज्यस्तरावरील सीईटी व्यतिरिक्त हि सामायिक प्रवेश परीक्षा दरवर्षी घेते. देशभरातील विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेता यावा यासाठी हि केंद्रीय स्तरावर हि परीक्षा घेतात.


8.    JEE Advanced ( जे.ई.ई.अडवान्सड  )

जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थीच फक्त या परीक्षेला पात्र होऊ शकतात. देशभरातील नामांकित आयआयटी व तत्सम संस्थानामध्ये प्रवेशासाठी हि परीक्षा महत्वपूर्ण आहे


9.    (BITSAT) (बिटसेट )

राजस्थान मधील पिलानी येथे  स्थित हि खासगी व स्वायत्त संस्था राजस्थान, गोवा तसेच तेलंगणा राज्यात अभियांत्रिकीचे शिक्षण देते. दरवर्षी केंद्रीय स्तरावर हि परीक्षा घेतली जाते. 

10.    AMU (B. Tech) (एएमयू )

उत्तरप्रदेश मधील अलिगड येथे स्थित हे शासकीय व केंद्रीय विद्यापीठ आहे. याव्यतिरिक्त केरळ, बिहार तसेच पश्चिम बंगाल राज्यातही हे विद्यापीठ आहे. दरवर्षी केंद्रीय स्तरावर हि परीक्षा घेतली जाते. 


याव्यतिरिक्त प्रत्येक राज्याच्या वेगळ्या सामायिक परीक्षा असतात ज्या दरवर्षी राज्यस्तरावर राबवल्या जातात. १२ वी बोर्ड परीक्षा संपत आल्यामुळे सगळीकडे पालकांची सामायिक प्रवेश परीक्षाकडे लक्ष आहे. 

अलीकडे अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाऱ्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असल्यामुळे मुलांचा व पालकांचा ओढा पूर्वीपेक्षा वाढत चालला आहे. त्यात ह्यावर्षी बऱ्याच नामांकित कंपन्या जसे कि इन्फोसिस, टीसीएस ई. मध्ये ५०००० होऊन अधिक जागा उपलब्ध असल्यामुळे यंदा अभियांत्रिकीला चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.  


 

लेखक

प्राध्यापक प्रवीण बी घेवारी 

डायरेक्टर,
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,
 वाठार तर्फ वडगाव 
ता. हातकणंगले जि. कोल्हापूर 
महाराष्ट्र पिन ४१६११२ 
मोबाईल : ७९१२८८२८०८, 
email : director@amgoi.edu.in 
 

लेखकाबद्दल थोडक्यात माहिती

लेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये प्राचार्य पदी काम करत आहेत. त्याचप्रमाणे ते  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात २५ वर्ष प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना ऍडमिशन  तसेच करिअर कॉऊंसेल्लिंग चा चांगला अनुभव आहे.