Our Blog

कठीण समय येता तंत्रज्ञान येते कामा

एरवी मोबाईल हे मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. परंतु तंत्रज्ञानाची महती किती प्रचंड आहे याची अनुभुती नुकतीच आली. सर्व काही सुरळीत चालू होते. निम्मे शैक्षणिक सत्र संपले होते व बातम्यांवर झळकणारी कोरोनाची बातमी इतकी गंभीर असू शकते याची कल्पना कोणीही केली नव्हती. 

एके दिवशी अचानक लाॅकडाऊनची घोषणा झाली व सगळे जागीच ठप्प झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान डोळ्यासमोर दिसू लागले होते व लॉकडाऊन कालावधी संबंधित कोणताही तर्क लावणे हे हाती नव्हते. अशावेळी मदतीला धावून आले ते अभियांत्रिकीने जन्माला घातलेले तंत्रज्ञान. होय तंत्रज्ञान. 

सदर लेखात आपण लॉकडाऊन काळातही अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने शिक्षणाचे व्रत अखंड कसे ठेवले व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थी तसेच पालकांप्रती आपले उत्तरदायित्त्व कसे पूर्ण केले व पर्यायाने समाजाशी असलेली बांधिलकी कशी जोपासली यावर दृष्टीक्षेप टाकणार आहोत. 

अ. विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान धावले

महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागाने उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तात्काळ नियोजन केले. दिवसा २ याप्रमाणे प्रत्येक दिवशी २ विषयांचे नियोजन केले. सोबतीला काही भागात नेटवर्क व इंटरनेट संबंधित असलेल्या समस्या पाहता अन्य पर्यायांचाही अवलंब केला. 

१. Conference meeting च्या सहाय्याने ऑनलाईन लेक्चर्स 

यापूर्वी व्यावसायिक स्तरावर conference meeting अथवा webinar घेण्यासाठी वापरली जाणारी अॅप्स जसे की Zoom, Google Meet, Webex इत्यादी लेक्चर्स घेण्यासाठी निश्चित करण्यात आली. विद्यार्थ्यांना संबंधित अॅप्स अगोदरच डाऊनलोड करण्याचे निर्देश दिले होते. मिटींग लिंक विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप ग्रुप वर पाठवण्यात आली व ठरलेल्या नियोजन नुसार ऑनलाईन लेक्चर्स पार पाडली. Screen annotations सुविधा असल्याकारणाने या अॅप्स च्या माध्यमातून pdf, slides, handwritten notes दाखवले व त्यावर शिकवणे अत्यंत सोपे होते. 

२. Screen recorder चा वापर

काही थेट लेक्चर्सचे screen recorder अॅप्स च्या साहाय्याने रेकॉर्डिंग केले व नंतर विद्यार्थ्यां त्यांच्या सोईने कधीही पाहू शकतील याची व्यवस्था केली. 

३. YouTube चा वापर

मोबाईल किंवा कॅमेरा वापरून घरी तयार केलेले विडिओ स्वतंत्र YouTube channel तयार करून त्यावर अपलोड केले जेणेकरून विद्यार्थी ते कधीही पाहू शकतील. प्रत्येक विषयास अनुसरून विविध YouTube विडिओ चॅप्टर निहाय लिस्ट तयार करून सामायिक करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध मोटीव्हेशनल विडिओ, वेबीनार, माहिती, स्कील डेव्हलपमेंट, संबंधित विडिओ सामायिक केले. 

४. Camscanner चा वापर

हस्तलिखित नोटस् camscanner सारख्या अॅप्स चा वापर करून pdf मध्ये रूपांतरित करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले. 

५. Google Drive, Google Classroom चा वापर

Ebooks, enotes, videos, ppts इत्यादी एकत्र एकाच ठिकाणी  G drive अथवा G classroom वर ठेऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले. 

६. Google forms वर परिक्षा

ऑनलाईन लेक्चर्स झाल्यानंतर त्याचे मूल्यांकन करण्यासाठी Quizzes तयार करून तात्काळ टेस्ट घेतल्या. किंबहुना विद्यापीठाच्या निर्देशानुसार Mid Semester परिक्षा देखील या माध्यमातून घेतली

७. ICT माध्यमांचा वापर

सदर काळात केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या ICT माध्यमांचा वापर ही केला.  विद्यार्थ्यांसाठी NDL व Swayam चा अॅक्सेस महाविद्यालयाच्या वेबसाइटवर करून दिला जेणेकरून स्टडी मटेरियल शोधणे सुलभ व्हावे. सोबत विद्यार्थ्यांसाठी NPTEL लेक्चर्स सेरीज उपलब्ध करून दिल्या. काही विषयांचे प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी  virtual lab या माध्यमाचा वापर केला. 

८. Skype चा वापर

विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट प्रेझेंटेशन तसेच कँपस तयार व मुलाखती या माध्यमातून घेण्यात आल्या. 

९.   Google चा वापर

Google search engine चा वापर करून विविध माहिती, लेख, स्लाइड, विडिओ, पुस्तके एकत्र करून विद्यार्थ्यांना सामाईक केले. 

१०. Phone, Email, WhatsApp, Facebook चा वापर

या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे तसेच माहिती देवाणघेवाण करण्यात आली. 

 

ब. पालकांसाठी तंत्रज्ञान पोहोचले

सदर काळात पालकांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना धीर दिला.  टेक्स्ट मेसेज द्वारे माहिती पोहचवली. व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून नियोजन पोहोचले व विडिओ कॉल द्वारे संवाद साधून आत्मविश्वास निर्माण केले. 

क. समाजाशी तंत्रज्ञानाने जोडले

या कठीण काळात फक्त विद्यार्थी व पालक हेच केंद्र बिंदू ठेवून चालणार नव्हते तसे पाहता समाजातील सर्व घटकांशी संवाद साधून त्यांचेही मनोधैर्य वाढवणे गरजेचे होते. 

महाविद्यालये सदर काळात आयोजित केलेली काही प्रबोधन पर उपक्रमे खालील प्रमाणे

१. Webinar चे आयोजन

ICT माध्यमांचा वापर, अभियांत्रिकीतील संधी, तंत्रज्ञान, कोरोना इ विविध विषयांवर webinar चे आयोजन केले होते व सर्वाना खुले केले होते. 

२.  Quizzes चे आयोजन

समाज प्रबोधन करण्यासाठी  google forms च्या माध्यमातून कोरोना, पर्यावरण, नॅशनल टेक्नॉलॉजी डे, फंडामेंटल ऑफ इंजिनिअरिंग इ विषयावर quizzes चे  करण्यात आले व स्पर्धकांना सर्टिफिकेट देण्यात आले. 

३. CET mock test चे आयोजन

मुख्य परिक्षेपुर्वी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या हेतूने १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रामानुजन सायन्स टॅलेंट हंट या नावाने सीईटी परिक्षा आयोजित केली होती. राज्यभरातून या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ५०० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता

४. ऑनलाईन पोस्टर स्पर्धेचे आयोजन

कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी तू चाल पुढं या नावाने ऑनलाईन पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा सर्व वयोगटातील लोकांसाठी खुली ठेवण्यात आली होती. सर्व स्पर्धकांचे पोस्टर्स संस्थेच्या फेसबुक पेज वर ठेवून समाजप्रबोधनाचे कार्य केले. या स्पर्धेत एकूण ३८२ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. 

आज अशोकराव माने ग्रुपचे समाजातील विविध स्तरातून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक झाले परंतु हे सर्व शक्य झाले ते केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने. विद्यार्थी, पालक तसेच समाजातील सर्व घटकांशी या कठीण काळात सुद्धा जोडता आले ते फक्त तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. 

अभियांत्रिकीने जन्माला घातलेले तंत्रज्ञान कठीण काळात आपले आयुष्य किती सहज करू शकते याची प्रत्यक्ष अनुभुती मिळाली. हे सर्व पाहता एक मात्र नक्की आहे ते म्हणजे अभियांत्रिकीचे उज्वल भविष्य व लोकांचा तंत्रज्ञानावरचा प्रगाढ विश्वास. 

महाविद्यालया बद्दल थोडक्यात माहिती

ग्रामीण भागातील व तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत उच्च व गुणवत्तापूर्ण अत्याधुनिक शिक्षण पोहोचले पाहिजे या उद्दात हेतूने सन २००९ साली श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप या संस्थेअंतर्गत अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस् या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.  वाठार तर्फे वडगाव येथे २० एकरच्या निसर्गरम्य परिसरात इंटिग्रेटेड कॅम्पस आहे. यामध्ये अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, एम. बी. ए. व आय. टी. आय. हे अभ्यासक्रम चालवले जातात. या कॅम्पस मध्ये दरवर्षी ३००० हून अधिक विद्यार्थ्यी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. 

महाविद्यालयाला नॅकचे 'ए' ग्रेड मानांकन प्राप्त असून मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल हे अभ्यासक्रम एनबीए मानांकित आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री विजयसिंह माने यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची घौडदौड यशस्वीरीत्या चालू आहे. 

धन्यवाद !!!

 

१. प्रा. पी. बी. घेवारी

प्रभारी संचालक, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस्, वाठार

 

लेखक 

प्राध्यापक प्रवीण बी घेवारी 

प्रभारी संचालक, 

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,

वाठार तर्फ वडगाव 

ता. हातकणंगले जि. कोल्हापूर 

महाराष्ट्र पिन ४१६११२ 

मोबाईल : ७९१२८८२८०८, 

email : director@amgoi.edu.in

लेखकाबद्दल थोडक्यात माहिती

लेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये प्रभारी संचालक या पदी काम करत आहेत. त्याचप्रमाणे ते  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात २५ वर्ष प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना ऍडमिशन  तसेच करिअर कॉऊंसेल्लिंग चा चांगला अनुभव आहे